पुणे - टोल नाक्यावर वाहनचालकांना बनावट पावत्या देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील नऊ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदेश प्रकार गंगावणे (वय 25 वर्षे, रा. धूम काॅलनी, ता.वाई, जि.सातारा), अक्षय तानाजी सणस (वय 22 वर्षे, रा. नागेवाडी, ता.वाई जि.सातारा), शुभम सिताराम डोलारे (वय 19 वर्षे, रा. जनता वसाहत, पुणे), साई लादुराम सुतार वय (वय 25 वर्षे, रा. दत्तनगर, कात्रज, पुणे), हेमंत भाटे, दादा दळवी, सतिश मरगजे, संकेत जयवंत गायकवाड आणि अजय काशिनाथ चव्हाण, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर 190 रुपयांची टोल पावती असताना 100 रुपये घेऊन वाहनचालकांना टोलपावती न देता सोडून दिले जात असल्याचा तक्रार अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला होता. या शिवाय टोल नाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालक व शासनाची फसवणूक केली जात असल्याची ऑनलाइन तक्रारही ग्रामीण पोलिसांकडे आली होती.
सापळा रचून टाकण्यात आला छापा