बारामती(पुणे) - दोन फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून छापा टाकून एका आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून विदेशी बनावटीचे १ पिस्तूल व २ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
बारामतीत विदेशी बनावटीचे १ पिस्तूल व २ जिवंत काडतुसे हस्तगत, एकास अटक - accused arrested
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून पोलिसांनी विदेशी बनावटीचे १ पिस्तूल व २ जिवंत काडतुसे हस्तगत केली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बारामती शहर, तालुका व भिगवण पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेले फरार आरोपी विजय बाळासाहेब गोफणे, बाळा पोपट दराडे यांचा शोध सुरू होता. दरम्यान मौजे निरगुड, अकोले, म्हसोबावाडी या परिसरात शोध सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारावरून आरोपी गोफणे व दराडे हे रात्री उशिरा झोपण्यासाठी वामन दराडे (रा.निरगुड ता.इंदापूर जि.पुणे) यांच्या वस्तीवर येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी (दि.५)रोजी पहाटे दराडे यांच्या वस्तीवर छापा टाकून शेतात पळून जात असलेल्या एकास पकडले व दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत शेतातून फरार झाला.
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून पोलिसांनी विदेशी बनावटीचे १ पिस्तूल व २ जिवंत काडतुसे हस्तगत केली. दरम्यान बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नंदू जाधव यांनी आरोपी विजय गोफणे, बाळा दराडे यांच्यावर कोणताही वैद्य परवाना नसताना बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक लगुटे यांनी दिली.