पुणे : पुणे - सातारा महामार्गावर कापूरहोळ गावच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे.रस्त्यावरचे खड्डे चुकवत असताना एका दुचाकीला वाचविण्याच्या नादान चालकाचे चारचाकी वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने वाहन डिवायडरला धडकून पलटी खाऊन अपघात ( lost vehicle control while dodging potholes ) झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले ( Traffic jam on Pune Satara highway ) आहे.
Pune Satara Highway Accident : खड्डे चुकविण्याच्या नादात पुणे-सातारा महामार्गावर अपघात, लहानशा मुलासमोर गेला वडिलांचा जीव - Traffic jam on Pune Satara highway
पुणे - सातारा महामार्गावर कापूरहोळ गावच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे.रस्त्यावरचे खड्डे चुकवत असताना एका दुचाकीला वाचविण्याच्या नादान चालकाचे चारचाकी वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने वाहन डिवायडरला धडकून पलटी खाऊन अपघात ( lost vehicle control while dodging potholes ) झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले ( Traffic jam on Pune Satara highway ) आहे.
स्वतःचा जीव गमावला :वसीम इब्राहीम सय्यद (वय ४२ मुजावर कालनी, कराड, जि. सातारा ) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव असून हुजेफा वसीम सय्यद (वय १५ रा. मुजावर कालनी, कराड, जि. सातारा ) जावेद आदिलशाह इनामदार (वय ३६,) शैरोनिसा जावेद इनामदार ( दोघेही रा. नऱ्हे आंबेगाव) शाहरुख शरीफ मुजावर वय ३० ( रा. हिरवडे, ता. करवीर, कोल्हापूर ) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. या अपघाताची तीव्रता एवढी होती की, बघनाऱ्यानाचे देखील मन हेलावले आहे. कारण एका मुलाने आपल्या वडिलांना डोळ्या देखत मरताना पाहिले. दुसऱ्या वाहनाला वाचविण्याच्या नादात स्वतःचा जीव गमावला. या घटनेने काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली ( Pune Satara highway Traffic jam )होती.
जागीच मृत्यू :या अपघातात मुलाला जबर धक्का बसला असून वडील शुध्दीवर येत नसल्याने त्याने आपल्या वडिलांच्या कानाला फोन लावला अब्बा उठो ना मम्मी से बात करो ना अशी विनवणी करत होता. मात्र वडिलांच्या हृद्यापर्यंत त्याचा आवाज पोहचलाच नाही. चालकाला म्हणजेच त्या मुलाच्या वडिलांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.