पुणे- येथील पुणे-नाशिक महामार्गावर मंचर जवळील खान वस्तीजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऍपी रिक्षाला अपघात झाला. मालवाहतूक गाडीने मागील बाजूस जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यात ११ प्रवासी जखमी झाले असून जखमींवर मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावर अपघात; ११ प्रवासी जखमी - accident to a rickshaw
पुणे-नाशिक महामार्गावर मंचर जवळील खान वस्तीजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऍपी रिक्षाला मालवाहतुक गाडीने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला असून यात ११ प्रवासी जखमी झाले आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर अवैध वाहतुक होत असुन याकडे पोलीसांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.
आज सकाळच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरुन तीन चाकी एपी रिक्षा प्रवासी घेऊन मंचरच्या दिशेने जात असताना पाठीमागुन आलेल्या मालवाहतुक गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात अपघात झालेली रिक्षा प्रवाशांसह रस्त्यापासुन 20 फुट बाजुला झाडीमध्ये जाऊन कोसळली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर तीन चाकी रिक्षातुन अवैध वाहतुक होत असुन मोठ्या संख्येने प्रवाशी प्रवास करत असतात. मात्र याकडे पोलीसांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने या प्रवाशी वाहनांचे अपघात होत आहेत.