महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 17, 2019, 7:15 PM IST

ETV Bharat / state

पुणे-नाशिक महामार्गावर अवसरी फाटा येथे भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

संकेत आनंदराव भोईटे व ओमकार भीमराव भोईटे अशी या मृत तरुणांची नावे असून हे दोघेही फलटण, सातारा येथील रहिवासी असून त्यांचे मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

accident on Pune Nashik Highway
पुणे-नाशिक महामार्गावर अपघात

पुणे - दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाल्यानंतर दुचाकीवरील दोघे रस्त्यावर पडले, तेवढ्यात मागून आलेल्या एसटी बसने या दोघांनाही चिरडले. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर येथील अवसरी फाटा येथे घडली.

हेही वाचा -जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध

संकेत आनंदराव भोईटे व ओमकार भीमराव भोईटे अशी या मृत तरुणांची नावे असून हे दोघेही फलटण, सातारा येथील रहिवासी असून त्यांचे मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

आज सकाळच्या सुमारास मंचर येथील अवसरीफाटा येथे खेडकडून मंचरकडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असताना दुचाकी व ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. त्यावेळी दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले तेवढ्यात अचानक पाठीमागून येणाऱ्या एसटी बसने दोघांना चिरडले, यात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा -शैक्षणिक शुल्कवाढीच्या विरोधात 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण

ABOUT THE AUTHOR

...view details