महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : नवले पुलाजवळ सहा वाहनांचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, चार गंभीर - नवले पुल अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ आज सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात तब्बल सहा वाहने एकमेकांवर धडकल्याने हा अपघात झाला आहे.

accident-by-six-vehicles-collided-with-each-other-in-pune
पुण्यात भीषण अपघात, सहा वाहने एकमेकांवर धडकली

By

Published : Nov 29, 2020, 7:20 PM IST

Updated : Nov 29, 2020, 7:59 PM IST

पुणे -शहरातील मुंबई बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ आज सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. तब्बल सहा वाहने एकमेकांवर धडकल्याने हा अपघात झाला असून या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना तातडीने नवले हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास एक ट्रक मुंबईच्या दिशेने निघाला होता. नवले पुलाजवळ आल्यानंतर ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि त्याने समोर असलेल्या पाच ते सहा गाड्यांना जोराची धडक दिली. यामध्ये काही चारचाकी आणि दुचाकी वाहनांचाही समावेश आहे. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातील तीन वाहनांचा तर अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय सिंहगड वाहतूक विभाग आणि अग्निशमन दलाच्या काही काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातामुळे मुंबई बंगळूर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहायाने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढले असून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Last Updated : Nov 29, 2020, 7:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details