महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत एसीबीची धाड - महानगर पालिकेत एसीबीची धाड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समितिच्या कार्यलयात आज अचानक एसीबीने धाड टाकत काही जणांची चौकशी केल्याचे समोर आले आहे. अद्याप ही कारवाई कोणावर करण्यात आली आहे, हे समजू शकलेले नाही.

एसीबीची धाड
एसीबीची धाड

By

Published : Aug 18, 2021, 7:43 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नाव लौकिक होते. आता त्याच महानगरपालिकेत लाचखोरीचे प्रकरण गाजत आहेत. महानगरपालिकेत काही महिन्यांपासून कालांतराने एसीबीकडून धाडी टाकण्यात येत आहे. अनेक महानगरपालिका अधिकारी एसीबीच्या गळाला लागलेले आहेत. आज (बुधवार) देखील स्थायी समितीच्या कर्मचाऱ्याला अटक केल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी अटक झालेल्या व्यक्तीचे नाव स्पष्ट होऊ शकले नाही.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समितिच्या कार्यलयात आज अचानक एसीबीने धाड टाकत काही जणांची चौकशी केल्याचे समोर आले आहे. अद्याप ही कारवाई कोणावर करण्यात आली आहे, हे समजू शकलेले नाही. परंतु यामुळे महानगरपालिकेसह पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, महानगरपालिकेतील धाड सत्र सुरू राहिल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. याअगोदर देखील अनेक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे महानगर पालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details