पुणे - जगभरात अनेक प्रकारच्या विषाणूजन्य साथीच्या रोगांचा धोका दिवसंदिवस वाढत चालला आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी संबंधित आजारावर उपचार करताना डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालून काम करावे लागत आहे. पीपीई किट घालून आठ-आठ तास सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अनेक त्रास होताना दिसून येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी पीपीई किटमध्ये हवा खेळती ठेवणाऱ्या उपकरणाचे संशोधन करण्यात आले आहे. कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालनालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे संशोधन करण्यात आले आहे.
पीपीई किटमुळे होणारा त्रास कमी होणार; हवा खेळती ठेवणाऱ्या उपकरणाचे संशोधन - कराड एसी पीपीई किट न्यूज
आरोग्य कर्मचाऱ्यांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी पीपीई किटमध्ये हवा खेळती ठेवणाऱ्या उपकरणाचे संशोधन करण्यात आले आहे. कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालनालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे संशोधन करण्यात आले आहे.
सातारा : पीपीई किटमध्ये हवा खेळती ठेवणाऱ्या उपकरणाचे संशोधन
कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाकडून नवीन पीपीई किट बनवण्यात आलं आहे. यात हवा खेळती राहते. यामुळे पीपीई किट परिधान करणाऱ्यांच्या शरीराचे तापमान सामान्य राहण्यास मदत होते. या उपकरणात 0.1 मायक्रोन आकाराचा हेपा फिल्टर बसवण्यात आला आहे. कोविड-19 चा विषाणू हा यापेक्षा मोठ्या आकाराचा असल्याने त्याचा शिरकाव या उपकरणाद्वारे होऊ शकत नाही, अशी माहिती डॉक्टर सुहास देशमुख यांनी दिली.
पीपीई किट वजनात हलके
हे उपकरण वजनाला हलके असून हाताळण्यास सोपे आहे. त्यामुळे डॉक्टर्स, नर्सेस, वार्ड बाय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना हे उपकरण आरामदायी पद्धतीने वापरता येणार आहे.
यापूर्वीही करण्यात आले अनेक संशोधन
कृष्णा वैद्यकीय अभिमत विद्यापीठातर्फे अनेक समाजपयोगी कामे करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाने विविध प्रकारचे संशोधन केले असून त्याची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. यापूर्वीही पर्यावरणपूरक अशा मास्कचे संशोधन केले आहे. तसेच वैद्यकीय उपकरणांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करणाऱ्या युवी सेवक 360° या उपक्रमाचे संशोधन ही त्यांनी केलं आहे.