पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्यात आगमन झाले आहे. पालखीचा आज पुण्यात मुक्काम आहे. पुण्यातील नाना पेठेत दोन्ही पालख्या मुक्कामाला असताना शहराच्या आजूबाजूला पुणेकर नागरिक तसेच विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविले जातात. पुण्यातील साखळीपीर तालीम येथे गेल्या 20 वर्षापासून अब्दुल रज्जाक चाचा हे वारकऱ्यांची सेवा करत आहे. विशेष म्हणजे अब्दुल रज्जाक चाचा हे हैद्राबाद येथे राहायला आहेत. ते पालखीच्या वेळेस पुण्यात येतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात. विशेष म्हणजे ते स्वतः हे तेल बनवितात. पुण्यात येऊन वारकऱ्यांची मालिश करत असतात.
वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा :अब्दुल रज्जाक चाचा हे पूर्वी पुण्यात रहायला होते. ते जरी मूळचे हैद्राबाद येथील असले तरी ते पुण्यात मुलींच्या येथे काही वर्ष राहायला होते. जडी बुटीपासून तेल तयार करून विविध आजारांवर औषाधोपचार रज्जाक चाचा हे करतात. गेल्या वीस वर्षांपासून रज्जाक चाचा हे पुण्यात वारकऱ्यांची सेवा करत आहे. ते आत्ता 8 ते 10 वर्षापासून ते त्यांच्या मूळ गावी हैद्राबाद येथील नारायण पेठ येथे राहायला गेले. मात्र असे असले तरी ते पुण्यात पालखी आल्यावर पुण्यात येतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात.