आळंदी (पुणे) - आज (मंगळवारी) दुपारी या पादुका एसटी बस विठाईने पंढरपूरला रवाना होत आहेत. इतक्या कमी वयात मला इतका मोठा सन्मान मिळणे, हे माझे भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया एसटी बस विठाईचे चालक यांनी व्यक्त केली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी सोहळ्यात सर्जा राजाची बैलजोडी माऊलींचा रथ घेऊन पंढरीकडे जात असते. मात्र, कोरोनाच्या महामारीत आषाढी वारी सोहळा हा मर्यादित लोकांमध्ये साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी रद्द करण्यात आली आहे. यामुळे यावर्षी आषाढी वारी सोहळ्याचा मान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस विठाईला मिळाला आहे.
भेटी लागी जिवा : माऊलींच्या पादुका 'विठाई'त होणार रवाना; चालकाने दिली प्रतिक्रिया - sant dnyaneshwar mauli paduka
आषाढी वारी सोहळ्यात लाखोंचा जनसमुदाय सहभागी होऊन या जनसमुदायातून सर्जा राजाची बैलजोडी माऊलींचा रथ पंढरीकडे घेऊन जात असते. हा नयनरम्य सोहळा देशातील प्रत्येक वारकरी भाविक अनुभवत असतो. मात्र, यावर्षी हा सोहळा होत असताना कोरोनाच्या महामारीचे संकट संपूर्ण जगावर आहे.
आषाढी वारी सोहळ्यात लाखोंचा जनसमुदाय सहभागी होऊन या जनसमुदायातून सर्जा राजाची बैलजोडी माऊलींचा रथ पंढरीकडे घेऊन जात असते. हा नयनरम्य सोहळा देशातील प्रत्येक वारकरी भाविक अनुभवत असतो. मात्र, यावर्षी हा सोहळा होत असताना कोरोनाच्या महामारीचे संकट संपूर्ण जगावर आहे. त्यामुळे हा सोहळा मर्यादित वारकर्यांच्या उपस्थितीत पार पाडला जात आहे. यावर्षी माऊलींच्या पादुका परंपरेनुसार पालखी मार्गावरून एसटीची विठाई बसने आज (मंगळवारी) दुपारी मार्गस्थ होणार आहेत, तर माऊलींच्या वारी सोहळ्यात सहभागी होण्याचा मान मिळाला हेच आमचे भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया विठाईचे चालक यांनी दिली.
हेही वाचा -जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे आज होणार पंढरपुरकडे प्रस्थान