महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यंदा पायी दिंडी नाहीच; वारकरी आणि प्रशासनाचे एकमत

आषाढी वारीबद्दल निर्णय घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमधे आज पुण्यातील कौन्सिल हॉलमधे बैठक पार पडली. आळंदी आणि देहूवरून निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एस टी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली.

By

Published : May 29, 2020, 5:00 PM IST

Updated : May 29, 2020, 7:45 PM IST

यंदा पायी दिंडी नाहीच; वारकरी आणि प्रशासनाचे एकमत
यंदा पायी दिंडी नाहीच; वारकरी आणि प्रशासनाचे एकमत

पुणे- आळंदी आणि देहुच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्यानंतर हे ठरवले जाईल. देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाले आहे.

यंदा पायी दिंडी नाहीच; वारकरी आणि प्रशासनाचे एकमत

आषाढी वारीबद्दल निर्णय घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमधे आज पुण्यातील कौन्सिल हॉलमधे बैठक पार पडली. या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी आणि देहुहून पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या, याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहु आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या.

यावेळी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समजून घेतल्या. त्यानंतर आळंदी आणि देहूवरून निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एस टी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली.

Last Updated : May 29, 2020, 7:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details