पुणे- खेड तालुक्यातील शिरगाव, मंदोशी अन् हुरसाळे या वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शूजचे वाटप करण्यात आले. आधार पावलांना या सामाजिक संस्थेकडून हा उपक्रम राबवण्यात आला.
आदिवासी भागातील शाळकरी मुलांना 'आधार पावलांना'कडून मदतीचा हात
गेल्या ५ वर्षांपूर्वी जिल्ह्यातील ३० तरुण एकत्र येत आधार पावलांना ही संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे आतापर्यंत १००० हून अधिक चिमुकल्यांच्या पावलांना आधार देण्याचे काम केले आहे.
स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही आदिवासी भागातील परिस्थिती जैसे थे आहे. याच समाजातील शाळकरी मुले डोंगराळ भागातून अनवाणी पायपीट करीत शाळेत जातात. मात्र, ही परिस्थितीच त्या मुलांना भक्कम बनवत असते. मात्र, या मुलांची गरज ओळखून आधार पावलांना या सामाजिक संस्थेने त्यांना शूज देण्याचे ठरवले आहे. त्याद्वारे ९० विद्यार्थ्यांना शूज वाटप करण्यात आले.
गेल्या ५ वर्षांपूर्वी जिल्ह्यातील ३० तरुण एकत्र येत आधार पावलांना ही संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे आतापर्यंत १००० हून अधिक चिमुकल्यांच्या पावलांना आधार देण्याचे काम केले आहे.