महाराष्ट्र

maharashtra

Firing in Pune : शेकोटी पेटवण्यावरून वाद, तरुणाकडून हवेत गोळीबार

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असून, एकीकडे शहरात कोयता गँगकडून दहशत पसरवीली जात आहे. तर, दुसरीकडे शहरात गोळीबार झाल्याच्या घटना घडली आहे. पुण्यातील येरवडा येथे शेकोटी पेटवण्यावरून तरुणाकडून हवेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

By

Published : Jan 24, 2023, 3:34 PM IST

Published : Jan 24, 2023, 3:34 PM IST

Pune Crime
फाईल फोटो

पुणे : सध्या राज्यासह शहरात थंडी वाढली असून, ठिकठिकाणी रात्री शेकोटी करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच शहरातील येरवडा येथे शेकोटी पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून हवेमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना वडगाव शेरी जवळील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी असलेल्या अर्नोल्ड स्कूलसमोर काल सोमवार (दि. 24 जानेवारी)रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

हवेमध्य गोळीबार : याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी दोन तक्रारी दाखल करण्यात आले आहे. येरवडा पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ब्रह्मा सनसिटीजवळ असलेल्या अर्नोल्ड स्कूलजवळ सागर गायकवाड, अक्षय खामकर, रोहित क्षत्रिय, रोहित जेधिया, सिद्धार्थ शिंदे आदी तरुण शेकोटी करीत बसलेले होते. त्या ठिकाणी अमित सिंह हा गेला. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची सुरू झाली. या वादातून अमित सिंह याची गाडी फोडण्यात आली. चिडलेल्या अमितने त्याच्याकडील पिस्तुलामधून हवेमध्य गोळीबार केली. त्यानंतर या तरुणांनी अमितला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या भागात दहशद कायम : पुण्यातील हडपसर, मांजरी, सिंहगड रोड आणि शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये कोयता गँगने दहशत माजवली आहे. संध्याकाळी, मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास अनेक नागरिकांवर तरुणांच्या टोळक्याने हल्ला केल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशदीचे वातावरण आहे. तसेच, या कोयता गँगमुळे नागरिकांचे मोठे नुकसानही झाले आहे. या सर्व घटना पाहता ही दरशद कधी थांबणार असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.

कोयता गॅंगचीही भिती :पुणे पोलिसांनी कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या गुंडांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला आहे. याआधी ज्यांनी कोयते घेऊन गुन्हे केले त्यांच्यावर आता प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. तसेच, जे सोशल मीडियावर कोयते घेऊन फोटो टाकत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई केली जात असल्याचे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे अमोल झेंडे यांनी सांगितलेलेल आहे.

कोयता गॅंगची दहशत केव्हा संपणार : गेल्या महिनाभरापासून पुण्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांवर कोयत्याने हल्ले झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. मांजरी, सिंहगड रोड, हडपसर, नाना पेठ, स्वारगेटसह अनेक भागांमध्ये आरोपींनी कोयत्याने गाड्या फोडत नागरिकांवर वार केल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आलेल्या आहेत. त्यानंतर आता शहरातील कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी आणि कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे.

हेही वाचा :कोयता विक्रेत्यावर छापेमारी; 105 कोयते जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details