बारामती (पुणे)- बारामती शहर पोलिसांनी बेकायदेशीर गावठी रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या एकाला अटक केली आहे. प्रतिक भालचंद्र शिंदे (वय 25 वर्षे, रा. हरिकृपा नगर, बारामती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुल जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपी व रिव्हॉल्वरसह पोलीस पथक गस्ती दरम्यान केली कारवाई
गस्ती दरम्यान येथील बारामती रुग्णालय परिसरात प्रतिक हा संशयास्पदरित्या फिरताना दिसला. त्याच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यास शिताफीने पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पंचवीस हजार रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे काळया रंगाचे लोखंडी रिव्हॉल्वर आढळून आली. याप्रकरणी प्रतीक शिंदे याला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.
हेही वाचा -गुंतवणुकीच्या आमिषाने १०० कोटींची फसवणूक; एकाला अटक
हेही वाचा -बाप लेकीच्या नात्याला काळीमा, नराधम बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार