पुणे -एका तरुणाचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील दत्तवाडी परिसरात घडली. अमित सरोदे (21) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अमित सरोदे हा रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाहू वसाहतीतील एका मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या तीन आरोपींनी अमित सरोदे याच्यावर अचानक हल्ला केला. एका हल्लेखोराने त्याच्यावर गोळ्या झाडल्या तर इतरांनी कोयत्याने त्याच्या डोक्यावर आणि मानेवर वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
गोळ्या झाडून तरुणाचा खून; पुण्याच्या दत्तवाडीतील प्रकार - dattawadi police station
अमित सरोदे हा रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाहू वसाहतीतील एका मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या तीन आरोपींनी अमित सरोदे याच्यावर अचानक हल्ला केला.
![गोळ्या झाडून तरुणाचा खून; पुण्याच्या दत्तवाडीतील प्रकार Murder of a young man by firing bullets in pune case filed against three](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8004350-thumbnail-3x2-punemurder.jpg)
गोळ्या झाडून तरुणाचा खून; पुण्याच्या दत्तवाडीतील प्रकार (प्रतिकात्मक)
हेही वाचा -दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यातून दोघांना अटक
स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर दत्तवाडी पोलीस घटनास्थळी हजर झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमित सरोदे याला तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर अधिक तपास सुरू आहे.