पुणे -सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्यासाठी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये नव्याने विहिरी आणि जुन्या विहिरींची खोली करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विहिरीचे खोदकाम सुरू असताना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील कोल्हारवाडी गणेशनगरमध्ये विहिरीचा वरचा भाग खाली पडल्याने एक मजूर या ढिगाऱ्याखाली दबला गेल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये त्या मजुराचा मृत्यू झाला आहे. किसन दामू गावडे असे या मजुराचे नाव आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात विहिरीचे खोदकाम करताना ढिगा-याखाली अडकलेल्या 'त्या' मजुराचा मृत्यू - rescue operation
विहिरीचे खोदकाम सुरू असताना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील कोल्हारवाडी गणेशनगरमध्ये विहिरीचा वरचा भाग खाली पडल्याने एक मजूर या ढिगाऱ्याखाली दबला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती.
ढिगा-याखाली अडकलेल्या 'त्या' मजूरचा मृत्यू
दरम्यान हे खोदकामाचे काम सुरू असताना अचानक ही घटना घडल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने किसन यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र विहिरीचे खोलीकरण जास्त असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते.
Last Updated : Apr 19, 2019, 7:33 AM IST