बारामती - शहरात व तालुक्यात सध्या कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण उपचार आणि कोरोनाची तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात येत आहेत. रुग्णालयातील दाखल प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रूग्ण व नागरिकांना कडक उन्हात ताटकळत उभे राहावे लागत होते. हे लक्षात आल्यावर ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना रुग्णांसाठी व नातेवाईकांसाठी रुग्णालयाच्या समोरच्या जागेत भव्य मांडव उभा करत प्रतिक्षा कक्ष तयार केले आहेत.
बारामतीत रुग्णालयाबाहेर रूग्ण आणि नातेवाईकांसाठी प्रतीक्षा कक्ष
रूग्णालयातील दाखल प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रूग्ण व नागरिकांना कडक उन्हात ताटकळत उभे राहावे लागत होते. हे लक्षात आल्यावर ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना रुग्णांसाठी व नातेवाईकांसाठी रुग्णालयाच्या समोरच्या जागेत भव्य मांडव उभा करत प्रतिक्षा कक्ष तयार केले आहेत.
बारामती शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा उपरुग्णालयात नागरिकांच्या रांगा लागत आहेत. रुग्णालयाची कार्यव्यवस्था पूर्ण होईपर्यंत आणि त्यांना बेड मिळेपर्यंत बाहेर ताटकळत उभे रहावे लागतात. बाहेर उन्हाचा पारा वाढत आहे. ही बाब लक्षात आल्यावर जेष्ठ नगरसेवक किरण गुजर व सहकाऱ्यांनी येथील सिल्वर जुबली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेत पॉझिटिव्ह रुग्णांची उपचाराची व्यवस्था होईपर्यंत आराम मिळावा, यासाठी डॉ. सदानंद काळे व उपाविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भव्य मंडपआणि लाईटची व्यवस्था करुन येथे साठ बेड टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता रुग्णांच्या झोपण्याची व्यवस्था होणार असून रुग्णांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांची याठिकाणी स्वतंत्र्य कक्षामध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना गरजेच्या असणाऱ्या व्यवस्था करण्यासाठी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, नगरसेवक बिरजु मांढरे, सुधीर पानसरे, अभिजित चव्हाण, अमर महाडिक व नटराज परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.