महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोणावळ्यामध्ये मद्यधुंद पर्यटकाचा धबधब्याखालील भोवऱ्यात बुडून मृत्यू

लोणावळ्यामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या मद्यधुंद पर्यटकाचा धबधब्याखालील भोवऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे. श्रीराम साहू (२४, रा.सणसवाडी, मूळ- ओडिशा) असे मयत तरुण पर्यटकाचे नाव आहे. धबधब्याच्या खाली पाण्याचा प्रवाह आणि वेग प्रचंड असल्याने तिथे पाण्याचा भोवरा तयार झाला होता.

By

Published : Jul 30, 2019, 11:57 PM IST

लोणावळ्यामध्ये मद्यधुंद पर्यटकाचा धबधब्याखालील भोवऱ्यात बुडून मृत्यू

पुणे -लोणावळ्यामध्ये मद्यधुंद पर्यटकाचा धबधब्याच्या पाण्यातील भोवऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी घडली. श्रीराम साहू (२४, रा.सणसवाडी, मूळ- ओडिशा) असे मयत तरुण पर्यटकाचे नाव आहे.

लोणावळ्यामध्ये मद्यधुंद पर्यटकाचा धबधब्याखालील भोवऱ्यात बुडून मृत्यू
मयत हा तीन मित्रांसह कंपनीला सुट्टी असल्याने लोणावळा येथे फिरण्यासाठी गेला होता. भुशी धरणावर मौज मजा करून तो घुबड तलावाच्या जवळ गेला. तेव्हा, तेथील धबधब्याच्या खाली असलेल्या भोवऱ्यात बुडून साहूचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम साहू हा त्याच्या कंपनीतील तीन सहकाऱ्यांसह लोणावळ्यात फिरण्यासाठी गेला. अगोदर भुशी धरणाकडे जाऊन मौज मजा करायची असे सर्व मित्रांचे ठरले. त्या अगोदर भुशी धरणाच्या अलीकडे एका हॉटेलमध्ये सर्वांनी दुपारचे जेवण आणि मद्यपान केले. त्यानंतर सर्व भुशी धरणाकडे गेले. तिथे त्यांनी दीड तास पाण्यात भिजून मौज-मजा केली. त्यानंतर रिक्षा करून घुबड तलावाकडे सर्वजण गेले. धबधब्याच्या खाली पाण्याचा प्रवाह आणि वेग प्रचंड असल्याने तिथे पाण्याचा भोवरा तयार झाला होता. त्यात साहू बुडाला. त्याला वाचवण्यासाठी मित्रांनी इतर पर्यटकांना आवाज दिला, मात्र तोपर्यंत साहूचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेचा अधिक तपास लोणावळा पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details