पुणे -अरुणाचल प्रदेशात सैन्य दलात कर्तुत्वावर असताना महाराष्ट्रातील एक जवान हुतात्मा झाला आहे. संभाजी ज्ञानेश्वर राळे ( वय ३०, ता. खेड, कुरकुंडी) असे जवानाचे नाव आहे.
खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे कर्तव्य बजावत असताना अरुणाचल प्रदेशातील तेजपुर येथे हुतात्मा झाले. संभाजी राळे यांचे पार्थिव उद्या सकाळी ८:३० वाजता लोहगाव विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर शासकीय रुग्णवाहिकेतून कुरकुंडी येथील शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. साडेदहा वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.