महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lok Sabha Elections : निर्मल सीतारामन यांचा दोन महिन्यांतच दुसऱ्यांदा बारामती दौरा - Union Finance Minister Nirmala Sitharaman

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Elections) बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपने (BJP) गांभीर्याने घेतल्याचे संकेत आहेत. ‘भाजप’ च्या मिशन ‘बारामती लोकसभा’ (Baramati Lok Sabha) जोरदार हालचाली दिसत असून आतापासूनच त्याची तयारी सुरु केली आहे.

Union Finance Minister Nirmala Sitharaman
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

By

Published : Nov 9, 2022, 9:46 AM IST

बारामती: 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपने गांभीर्याने घेतल्याचे संकेत आहेत. ‘भाजप’ च्या मिशन ‘बारामती लोकसभा’ जोरदार हालचाली दिसत असून आतापासूनच त्याची तयारी सुरु केली आहे.

बारामतीला मुक्कामी येणार:सप्टेंबरनंतर अवघ्या दोन महिन्यातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) दुसऱ्यांदा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. यंदा सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पुर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल (Prahlad Singh Patel) बारामतीला मुक्कामी येणार आहेत. याबाबत भाजप लोकसभा प्रमुख अविनाश मोटे यांनी बोलताना माहिती दिली.

दुसरा दौरा आयोजित केला: मोटे म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नोव्हेंबरच्या अखेरचा आठवडा किंवा डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दुसरा दौरा आयोजित केला आहे. त्याची पुर्वतयारी आतापासूनच सुुरु केली आहे.

माध्यमांशी संवाद साधणार: त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल बारामतीत 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी मुक्कामी दौऱ्यावर येणार आहेत. 11 तारखेला खडकवासला, भोर, पुरंदर, जेजुरीवरुन पटेल हे बारामती येथे येणार आहेत. यावेळी पटेल यांच्यासमवेत आमदार राम शिंदे, गणेश भेगडे, वासुदेव काळे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच पटेल हे 12 नोव्हेंबर रोजी इंदापुर, भिगवण, दौंड येथे भेट देणार आहेत. त्यानंतर कौन्सिल हॉल पुणे येथे माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे मोटे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details