पुणे- दौंड तालुक्यातील देवकरवाडी येथील साई ट्रेज या कपंनीमध्ये शार्ट-सर्कीटने आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या आगोदर कंपनीत अनेकदा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत .
देवकरवाडीतील कंपनीत शार्ट-सर्कीटने आ परिसरात धूर व आगीचे लोटया कंपनीत हगीजचे उत्पादन केले जाते. या कंपनीला आग लागण्याची ही चौथी वेळ आहे. मागील वर्षीही या कारखान्यास आग लागली होती. या आगीमुळे नागरिकामध्ये भितीचे वातावरण पसरले होते. या कंपनीमध्ये असणारा कच्चा माल आगीमुळे पुर्णपणे जळून गेला असून परीसरामध्ये धूर व आगीचे लोट पसरले होते. या आगीत सुमारे सव्वा कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाला असल्याचा अंदाज कंपनीच्या मालकांनी व्यक्त केला आहे.
आग आटोक्यातसंबंधीत घटनेची माहिती मिळताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या वाघोली व नांदेड सिटीयेथील अग्निशामक दलाचे सुजित पाटील व विजय महाजन यांच्यासह सुमारे वीस जवान घटनास्थळी दाखल झाले. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गायकवाड व सागर कदम यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याच्यावतीने पाण्याचा टँकर घटनास्थळी पाठवण्यात आला होता.
चार वेळा या कंपनीस लागली आगअत्तापर्यंत या कंपनीमध्ये चार वेळा आग लागली असून नेहमी शाँर्टसर्कीटचे कारण दाखवले जात आहे. यामध्ये लाखोंचे नुकसान होत असून विमा कंपन्यांकडुन नुकसान भरपाई मिळत असली तरी योग्य अग्नी प्रतिबंधक उपाय योजना का केल्या जात नाही? असा सवाल देवकरवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. याबाबत तातडीने योग्य निर्णय होणे अपेक्षित आहे. या घटनेमुळे शेजारील घरांचे, शेतमालाचेदेखील नुकसान झाले आहे.