पुणे- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सना अधिकाधिक वेळ द्यावा लागत आहे. तसेच या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याचाही धोका आहे. या पार्श्वभूमीवर आता कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी रोबोटला पाचारण करण्यात आले आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभाई रुग्णालयात हा रोबोट कार्यरत आहे.
Coronavirus : पुण्यातील 'या' रुग्णालयात रोबोट करतोय कोरोनाबाधित रुग्णांची सेवा - कोरोना विषाणू
रुग्णांना जेवण, औषध, पाणी देण्यासाठी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना रुग्ण असलेल्या बेडपर्यंत जावं लागतं. यासाठी 2 ते 3 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. मात्र, आता कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता कर्मचाऱ्यांची धास्ती वाढली आहे. त्यामुळे या रुग्णालयातील ही सर्व कामे रोबोटमार्फत केली जातात.

50 ते 60 मीटरच्या अंतरावरून या रोबोटला रिमोटच्या सहाय्याने ऑपरेट करता येते. एका बटनाच्या क्लिकवर कोरोना पेशंटच्या बेडपर्यंत जेवण, नाश्ता, पाण्याची बॉटल आणि औषधे घेऊन जातो. हा रोबोट दिवसभरात 2 ते 3 तास सातत्याने काम करतो. त्यामुळे एकाच वेळी 20 ते 25 किलोपर्यंत जेवण, नाष्टा, औषध घेऊन जाण्याची सोय झाली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आयटीआयमध्ये हा रोबोट तयार करण्यात आला आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या रोबोटसाठी 50 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी 5 दिवसात याची निर्मिती केली आहे, अशी माहिती आयटीआयचे प्राचार्य विजय चव्हाण यांनी दिली आहे.