दौंड (पुणे) - अल्पवयीन मुलीकडून देहव्यवसाय करून घेणाऱ्या एका व्यक्तीस पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. दौंड तालुक्यातील पाटस येथील पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. प्रवीण रामदास शिंदे असे अटकेत असलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बुधवारी (7 ऑक्टोबर) पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या सुलभ शौचालयाच्या मोकळ्या जागेत आरोपी अल्पवयीन मुलीकडून देहव्यवसाय करून घेताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आढळला. पोलिसांनी लगेच सापळा रचून त्याला पकडले आणि मुलीची सुटका केली.