महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील कोंढवा भागात भंगारच्या गोडाऊनला भीषण आग, एक कामगार जखमी - fire broke out at a scrap godown in Kondhwa Pune

पुणे पुण्यातील कोंढवा भागामध्ये एका भंगार मालाच्या गोडाऊनमध्ये मोठी आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे. ही घटना आज गुरुवार रोजी सायंकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या घटनेमध्ये एक कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  या भंगार मालाच्या गोडाउनमधे असलेल्या पञा, लोखंड, डबा, वायर व इतर मालाला आग मोठ्या प्रमाणात आग लागली असून, सर्व साहित्य जळून खाक झालेला आहे. ५ एसिटिलिन गॅस सिलेंडर व १२ एलपीजी सिलेंडर जवानांनी बाहेर काढले आहेत. अग्निशमन दलाकडून ५ फायरगाड्या व २ टँकर घटनास्थळी दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेमध्ये एक कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  त्याचे वय वर्ष 45 आहे. आग कस काय लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

पुण्यातील कोंढवा भागात भंगारच्या गोडाऊनला भीषण आग
पुण्यातील कोंढवा भागात भंगारच्या गोडाऊनला भीषण आग

By

Published : Nov 3, 2022, 10:12 PM IST

Updated : Nov 4, 2022, 6:27 AM IST

पुणे पुण्यातील कोंढवा भागामध्ये एका भंगार मालाच्या गोडाऊनमध्ये मोठी आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे. ही घटना आज गुरुवार रोजी सायंकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या घटनेमध्ये एक कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या भंगार मालाच्या गोडाउनमधे असलेल्या पञा, लोखंड, डबा, वायर व इतर मालाला आग मोठ्या प्रमाणात आग लागली असून, सर्व साहित्य जळून खाक झालेला आहे. ५ एसिटिलिन गॅस सिलेंडर व १२ एलपीजी सिलेंडर जवानांनी बाहेर काढले आहेत. अग्निशमन दलाकडून ५ फायरगाड्या व २ टँकर घटनास्थळी दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेमध्ये एक कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे वय वर्ष 45 आहे. आग कस काय लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Last Updated : Nov 4, 2022, 6:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details