महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सासरच्या जाचाला कंटाळून इंदापुरात विवाहितेची आत्महत्या - baramati latest news

सविता हिचा दीड वर्षापूर्वी अंबादास वाघमारे याच्याशी विवाह झाला होता. दोन महिने व्यवस्थित संसार चालू होता. त्यानंतर मात्र आरोपींनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ, मारहाण व जाच सुरू केला.

Indapur suicide
Indapur suicide

By

Published : Nov 29, 2020, 10:58 AM IST

बारामती -घरातील किरकोळ कारणावरून वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

सविता अंबादास वाघमोडे (वय २०, रा. काळेवाडी नंबर १, ता. इंदापूर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मृत महिलेची आई राणी अंबादास वाघमोडे (रा. वटफळी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती अंबादास रामचंद्र वाघमोडे, सासू पोशा उर्फ शालन रामचंद्र वाघमोडे, सासरे रामचंद्र शेटोबा वाघमोडे (सर्व रा. काळेवाडी नंबर १, ता. इंदापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींकडून मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता हिचा दीड वर्षापूर्वी अंबादास वाघमारे याच्याशी विवाह झाला होता. दोन महिने व्यवस्थित संसार चालू होता. त्यानंतर मात्र आरोपींनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ, मारहाण व जाच सुरू केला. मुलगी सासरी आल्यानंतर मला याची कल्पना दिली होती, त्यावर समजावून सांगत होतो. मात्र शुक्रवारी दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सविताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील लोंढे करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details