पुणे - कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात आला आहे. बाजारपेठा बंद असल्याने काढणीला आलेली उभी पिकं मातीमोल झाली आहेत. खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या माजी सभापती सुभद्रा शिंदे यांनी उभ्या कोबी आणि फॉल्वरच्या पिकामध्ये मेंढ्या सोडल्या आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकजण घरात बसल्याने 'पैसा यायचा कुठून, खायचं काय' असा सवाल सुभद्रा शिंदे यांनी केला आहे.
खेड तालुक्यातील ठाकरवाडी येथे सुभद्रा शिंदे यांनी एक एकर शेतात एक लाख रुपयांचा खर्च करुन कोबी आणि फॉल्वरचे पीक घेतले. यातून त्यांना दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, पीक काढणीला येणार याच काळात लॉकडाऊन करण्यात आले. बाजारबंद झाल्याने उभं पीक शेतातच पडून राहिले. त्यामुळे आता उभ्या पिकात मेंढ्या सोडण्याची वेळ सुभद्रा शिंदे यांच्यावर आली आहे.