महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 27, 2019, 4:38 PM IST

ETV Bharat / state

भोसरी: बाप-लेकाची किरकोळ कारणावरून महिला आणि मुलीला बेदम मारहाण

किरकोळ कारणावरून बाप-लेकाने एका महिलेला आणि तिच्या मुलीला मारहाण केल्याची घटना भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lady and her daughter beaten
महिला आणि मुलीला मारहाण

पुणे - किरकोळ कारणावरून बाप-लेकाने एका महिलेला आणि तिच्या मुलीला मारहाण केल्याची घटना घडली. भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या घटने प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबलू आबा गायकवाड, आबा गोपीनाथ गायकवाड (रा.भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या बाप-लेकाची नावे आहेत.

हेही वाचा - सुप्रिया सुळे यांनी सर्व आमदारांचे केले स्वागत, पाहा व्हिडिओ
आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपी आबा हा फिर्यादी आशा यांचा मेहुणा आहे. मंगळवारी आरोपी आबा आणि आशा हे बोलत थांबले होते. तेव्हा माझ्या वडिलांबरोबर का बोलतेस? असे विचारत बबलूने फिर्यादी आशा यांना शिवीगाळ करत मारहाण केली. नंतर त्याने लाकडी दांडक्याने महिलेला जबर मारहाण केली. आशा यांची मुलगी भांडण सोडवण्यासाठी मधे आली असता आरोपी बबलू आणि आबा या दोघांनी मिळून तिला देखील मारहाण केली.

ABOUT THE AUTHOR

...view details