महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील भाऊ इंडस्ट्रीजमधील एका कंपनीत भीषण आग; एकाचा मृत्यू - नांदेड फाटा

नांदेड फाटा येथे भाऊ इंडस्ट्रीज आहे. याठिकाणी मोठं-मोठ्या कंपन्या आहेत. त्यातील एका कंपनीला सकाळी आग लागली. ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दल 8 अग्निशमन वाहने दाखल झाले आहेत. कंपनीत केमिकल असल्याने स्फोट होत आहेत.

कंपनीत भीषण आग
कंपनीत भीषण आग

By

Published : Sep 16, 2021, 12:28 PM IST

Updated : Sep 16, 2021, 4:40 PM IST

पुणे - शहरातील नांदेड फाटा येथील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका कंपनीत भीषण आग लागली असून, यात काही कामगार अडकले आहेत. जवानांना पहिला मृतदेह सापडला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. केमिकल असल्याने एकापाठोपाठ एक स्फोट होत आहेत.

पुण्यातील भाऊ इंडस्ट्रीजमधील एका कंपनीत भीषण आग

नांदेड फाटा येथे भाऊ इंडस्ट्रीज आहे. याठिकाणी मोठं-मोठ्या कंपन्या आहेत. त्यातील एका कंपनीला सकाळी आग लागली. ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दल 8 अग्निशमन वाहने दाखल झाले आहेत. कंपनीत केमिकल असल्याने स्फोट होत आहेत. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात भडकली आहे.

माहिती देतांना पोलीस

या कंपनीत काही कामगार महिला अडकल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन जवानांनी पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या एक मृतदेह मिळून आला आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. महिला व इतर कामगार होरपळून गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा -32 कोटी खर्चूनही लासुर ते कोपरगाव महामार्गावर खड्डे; पालकमंत्री सुभाष देसाईंची थेट नितीन गडकरींकडे तक्रार

Last Updated : Sep 16, 2021, 4:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details