पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये एका गृहिणीने रांगोळीतून हुबेहूब पैठणी साडी साकारली आहे. विजयमाला उदय पाटील असे हा गृहिणीचे नाव आहे. नऊ फूट लांब आणि साडेचार फूट रुंद रांगोळीसाठी त्यांना तीन दिवसांचा कालावधी लागला.
लहानपणापासून विजयमाला यांना रांगोळीची आवड असल्याने त्या मागील अनेक वर्षांपासून रांगोळी काढत आहेत. मात्र, आपल्या कलेतून काहीतरी वेगळे करून दाखवण्याची त्यांना इच्छा होती. विजयमाला यांनी काढलेली पैठणी रांगोळी पाहण्यासाठी अनेक नागरिक गर्दी करत आहेत. शहरी भागात मोठी रांगोळी काढण्यासाठी जागा नसते. त्यामुळे विजयमाला यांनी घरातील हॉलमध्येच रांगोळी काढली आहे. पैठणी साडीचा फोटो पाहून त्यांनी रांगोळीतून हुबेहूब पैठणी साकारली.