महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : आजोबाने नातीचे शाही थाटात केले स्वागत, सुनेसह तिला हेलिकॉप्टरने घरी आणले - नात हेलिकॉप्टर स्वाग बालेवाडी पुणे

'कन्यारत्न येती घरा, हर्षाला नसे सीमा’ या ओळी सार्थक ठरवित बालेवाडी ( Granddaughter brought by helicopter in Balewadi Pune ) येथील शेतकरी अजित पांडूरंग बालवडकर ( Ajit Balwadkar brought Granddaughter by helicopter ) यांनी त्यांची नात क्रिशिका हिच्या जन्माचे जंगी ( Helicopter news balewadi pune ) स्वागत केले.

Helicopter news balewadi pune
क्रिशिका स्वागत हेलिकॉप्टर बालेवाडी पुणे

By

Published : Apr 27, 2022, 10:24 AM IST

Updated : Apr 27, 2022, 10:43 AM IST

पुणे - 'कन्यारत्न येती घरा, हर्षाला नसे सीमा’ या ओळी सार्थक ठरवित बालेवाडी ( Granddaughter brought by helicopter in Balewadi Pune ) येथील शेतकरी अजित पांडूरंग बालवडकर ( Ajit Balwadkar brought Granddaughter by helicopter ) यांनी त्यांची नात क्रिशिका हिच्या जन्माचे जंगी स्वागत केले. बालवडकर यांनी सुनेसह नातीला तिच्या माहेरातून पुण्यातील पाटील वस्ती बालेवाडी ( Helicopter news balewadi pune ) येथे सासरी चक्क हेलिकॉप्टरने आणले.

माहिती देताना बालवडकर कुटुंब

हेही वाचा -Mangoes Prices : वातावरणीय बदलाचा आंब्याला फटका, आवक वाढल्याने किंमती झाल्या कमी

अजित पांडूरंग बालवडकर आणि संगीता अजित बालवडकर यांचा मुलगा कृष्णा बालवडकर आणि सून अक्षता बालवडकर यांना मुलगी क्रिशिका जन्माला आली. शाही थाटात आपल्या नातीचे स्वागत करायचे, अशी अजित पांडूरंग बालवडकर यांची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी सुनेच्या माहेरातून सुनेसोबत क्रिशिका ( Krishika brought by helicopter in balewadi pune ) या नातीला आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठविले. एवढेच नव्हे तर, पाटील वस्ती बालेवाडी येथे हेलिपॅडचे निर्माण करण्यात आले. घरी वाजत गाजत नातीला कारने घरी आणले. गुलाबांच्या पाखळ्यांची उधळण करीत स्वागत करण्यात आले.

सध्या ट्रेंड सुरू - अलिकडच्या काळात अनेकांकडून मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. पुणे आणि ग्रामीण भागात मुलींच्या जन्माचा दर 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. याआधी खेड येथे झरेकर कुटुंबीयांच्यावतीने असाच एका मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव करण्यात आला होता. नातीला चक्क हेलिकॉप्टरने घरी आणल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अजित पांडूरंग बालवडकर यांनी याद्वारे बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा संदेशही दिला.

हेही वाचा -VIDEO : जाणून घ्या पुण्याची ओळख असलेले पेशवेकालीन श्री मृत्युंजयेश्वर मंदिर

Last Updated : Apr 27, 2022, 10:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details