महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरीत शंभर सीसीटीव्ही तपासून लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळीला अटक - नाना माणिक पवार अटक

पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरातील एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी गणेश उर्फ नाना माणिक पवार (रा. नवी मुंबई) बबन काशिनाथ चव्हाण (वय ३९, रा. तिर्हे तांडा सोलापूर) आणि बसू जगदीश चव्हाण (वय ४५ रा. बिराजदार नगर हडपसर) याला अटक करण्यात आली असून चोरीचे लॅपटॉप खरेदी करणाऱ्या व्यक्तींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर दोन साथीदार अद्याप फरार आहेत.

लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळीला अटक
लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळीला अटक

By

Published : Oct 29, 2020, 6:01 PM IST

पुणे- पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात कारची काच फोडून लॅपटॉप आणि रोकड लंपास करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून महागडे कंपनीचे १८ लॅपटॉप, ३ वायफाय डोंगल, १ कॅमेरा, २ दुचाकी, असा एकूण १२ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

माहिती देताना पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

दोन्ही शहरातील एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी गणेश उर्फ नाना माणिक पवार (रा. नवी मुंबई) बबन काशिनाथ चव्हाण (वय ३९, रा. तिर्हे तांडा सोलापूर) आणि बसू जगदीश चव्हाण (वय ४५ रा. बिराजदार नगर हडपसर) याला अटक करण्यात आली असून चोरीचे लॅपटॉप खरेदी करणाऱ्या व्यक्तींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर दोन साथीदार अद्याप फरार आहेत.

तपास करत असताना १०० सीसीटीव्ही तपासून आरोपींचा शोध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ३० वाहनांच्या काचा फोडून सराईत आरोपी हे महागडे लॅपटॉप आणि रोकड लंपास करत होते. दरम्यान, त्यांच्या मागावर गुन्हे शाखा युनिट ४ चे अधिकारी होते. हिंजवडीमधील एका लपटॉप चोरी संबंधी तपास करत असताना १०० सीसीटीव्ही तपासून आरोपींचा पोलिसांनी शोध लावला. मुख्य सराईत आरोपी गणेश उर्फ नाना माणिक पवार याला नवी मुंबई परिसरातून अटक करण्यात आली, तर इतर दोन्ही साथीदारांना सोलापूरमधून ताब्यात घेण्यात आले.

१३ पैकी ७ गुन्हे हे हिंजवडी पोलीस ठाणे परिसरातील

आरोपी गणेश पवार याच्यावर मुंबईमध्ये २४ गुन्हे दाखल आहेत. त्याने गोवा राज्यात देखील तेथील आरोपींच्या मदतीने वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉप लंपास केले आहेत. दरम्यान, १३ गुन्हे उघडकीस आले असून पैकी ७ गुन्हे हे हिंजवडी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडले आहेत. तर, हडपसर, वाकड, बंडगार्डन या पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॅपटॉप चोरी केल्याचेही उघड झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, आवटे, पोलीस कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ आदींनी केली.

हेही वाचा-बारामती शहरातील रस्त्यांची दुरवस्था जैसे थे

ABOUT THE AUTHOR

...view details