महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हडपसर परिसरातून चार महिन्याच्या बाळाचे अपहरण - बाळ अपहरण हडपसार पुणे

बस प्रवासात ओळख झालेल्या एका महिलेने चार महिन्याच्या बाळाचे अपहरण केले आहे. ही घटना हडपसार परिसरात घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये 23 वर्षीय महिलेने तक्रार दिली असून, पोलीस अपहरणकर्त्या महिलेचा शोध घेत आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Nov 18, 2020, 10:59 PM IST

पुणे - बस प्रवासात ओळख झालेल्या एका महिलेने चार महिन्याच्या बाळाचे अपहरण केले आहे. ही घटना हडपसार परिसरात घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये 23 वर्षीय महिलेने तक्रार दिली असून, पोलीस अपहरणकर्त्या महिलेचा शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या महिलेचे पतीसोबत भांडण झाले होते. त्या रागातून तिने चार महिन्याच्या बाळाला घेऊन घर सोडले. मूळची लोणी गावातील ही महिला अहमदनगरमध्ये गेली. त्यानंतर तेथून तिने अहमदनगर ते सातारा बस पकडली. या प्रवासादरम्यान तिच्या शेजारी आणखी एक महिला येऊन बसली होती. तिने तिच्याशी ओळख वाढवत गप्पा मारल्या. त्यानंतर या दोघी महिला स्वारगेट बसस्थानकावर उतरल्या व तेथून हडपसर परिसरात गेल्या. हडपसरमध्ये गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले आणि त्यानंतर आरोपी महिलेने फिर्यादी महिलेकडून बाळाला घेतेले व खाऊ आणते, असे सांगून पोबारा केला.

बराच वेळ शोधाशोध केल्यानंतरही आपले बाळ सापडत नसल्याचे पाहून फिर्यादी महिलेने हडपसर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हडपसर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली. बाळाचा शोध घेण्यासाठी हडपसर पोलिसांनी पथके तयार केली असून या महिला ज्या परिसरात गेल्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा -पुण्यातील 'त्या' दोघांच्या माध्यमातून कोरोनात नोकरी गेलेल्या 400 हून जास्त युवकांना मिळाला रोजगार!

ABOUT THE AUTHOR

...view details