पुणे -राज्यात जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाचा जोर कमी राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. सध्या राज्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक अशी अनुकूल स्थिती नसल्याने पाऊस कमी पडेल, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.
येत्या चोवीस तासात कोकण, गोवा परिसरात पावसाची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरचे पुढील पाच दिवस या भागात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात ही 24 तासात हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील चार ते पाच दिवसात पावसाचा जोर कमी राहील. 25 जूनला राज्यातील विदर्भासह अनेक भागात पाऊस राहील. 26 तारखेनंतर विदर्भात पावसाचा जोर कमी राहील.