पुणे - कोरोना आणि आवकाळी पावसाने हतबल झालेला बळीराजा आता कोथिंबीरला बाजारभाव मिळत नसल्याने हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील चांडोह येथील काळुराम रोकडे यांनी हाताश होऊन आपल्या तीन एकर शेतातील कोथिंबीर पिकात मेंढ्या सोडल्या आहेत. पिकाला भाव मिळत नसल्याने त्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोथिंबीरला चांगला भाव मिळेल, या आशेने रोकडे यांनी शेतात कोथिंबीर पीक उगवले होते. हे पीक चांगलेच बहरले. मात्र, सध्या कोथिंबीरला बाजारात एक ते दोन रुपये प्रति जुडा भाव मिळत आहे. यातून काढणीचाही खर्च मिळणार नाही. त्यामुळे, हाताश होऊन रोकडे यांनी आपल्या शेतात मेंढ्या सोडल्या.