पुणे : या आत्महत्येत पन्नास वर्षांच्या आजोबांपासून तीन वर्षांच्या नातवाचा समावेश आहे. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. यात मोहन उत्तम पवार (वय 50 वर्षे) संगीता मोहन पवार ( वय 45 वर्षे, दोघे रा. खामगांव ता. गेवराई) त्यांचे जावई शामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय 32 वर्षे) त्यांची पत्नी राणी शामराव फुलवरे (अंदाजे वय 27 वर्षे) शामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (वय 7 वर्षे) छोटू शामराव फुलवरे (वय 5 वर्षे) आणि कृष्णा (वय 3 वर्षे) असे एकूण 7 जणांचे मृतदेह या नदीपात्रात आढळून आले आहेत.
महिलेला घरी सोडवण्यासाठी एक दिवसाचा कालावधी दिला होता : या एकच कुटुंबातील सर्वांनी आत्महत्या करण्याचे कारण आता समोर येत आहे. पवार यांच्या मुलाने विवाहित महिला पळवून घेऊन गेला होता. मात्र, या महिलेला घरी घेण्यास पवार कुटुंबीयांनी विरोध केला, त्या महिलेला तिच्या घरी सोडून ये. आपण आपल व्यवस्थित राहू, या महिलेला घरी सोडवण्यासाठी एक दिवसाचा कालावधी देखील दिला होता. जर तू या महिलेला घरी सोडवले नाही तर आम्ही सर्वजण आत्महत्या करू, असा दम देखील कुटुंबीयांनी त्यांच्या मुलाला दिला होता. मात्र, पवार यांच्या मुलाने गोष्ट एकली नाही आणि या कुटुंबातील सात जणांनी भीमा नदीत उडी मारून आत्महत्या हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मोहन पवार हे आपल्या कुटुंबीयांसोबत निघोज ( ता. पारनेर ) येथे मागील एक वर्षांपासून मजुरीचे काम करत होते.