महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ते' स्वखर्चाने करताहेत आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप - पिंपरी-चिंचवड आर्सेनिक अल्बम 30 वाटप

गप्रतिकारक शक्ती योग्य असल्यास कोरोनाची बाधा होत नसल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. यासाठी सरकार मान्य आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या वरदान ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एक दाम्पत्य गरीब व्यक्तींना आणि महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने या गोळ्याचे वाटप करत आहे.

Tablet Distribution
गोळ्या वाटप

By

Published : Jun 7, 2020, 4:35 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शहरातील बाधितांची संख्या 700 च्या पुढे गेली असून ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने रोगप्रतिकारक शक्ती वाढवत आहेत. यासाठी सरकार मान्य आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या वरदान ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एक दाम्पत्य गरीब व्यक्तींना आणि महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने या गोळ्याचे वाटप करत आहे.

जवळकर दाम्पत्य स्वखर्चाने गोळ्यांचे वाटप करत आहे

तानाजी जवळकर आणि तृप्ती जवळकर असे या दाम्पत्याचे नाव आहे. अत्तापर्यंत त्यांनी 8 हजार गोळ्यांचे वाटप केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आत्तापर्यंत शेकडो जणांना याची लागण झाली आहे. रोगप्रतिकारक शक्ती योग्य असल्यास कोरोनाची बाधा होत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप हे दाम्पत्य करत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर असलेले तानाजी जवळकर आणि त्यांची पत्नी तृप्ती जवळकर यांनी घरोघरी जाऊन गरीब व्यक्तींना आणि महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आर्सेनिक गोळ्यांचे वाटप केले. प्रत्येक नागरिक सुदृढ राहून कोरोना विषाणूचा मुकाबला करेल आणि एक दिवस पिंपरी-चिंचवड शहर कोरोना मुक्त होईल, असा विश्वास जवळकर दाम्पत्याने व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details