पुणे - बुधवारी रात्री झालेल्या पावसात सर्वत्र पाणी साचले होते. यात प्रत्येकजण स्वत:चा जीव वाचवण्याची धडपड करत असताना अग्निशामक दलाच्या जवानानी दाखवलेल्या प्रसंगावधानाने एका लहान चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत.
जलमय पुणे: अग्निशमन दलाच्या जवानाने वाचवले दीड वर्षाच्या बाळाचे प्राण - पुणे पूर बातमी
पुण्यात पावसाच्या पाण्यात अडकलेल्या दीड वर्षाच्या बाळाला अग्निशमन दलाच्या जवानाने वाचवले. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनीही तत्काळ मदतकार्य सुरू केले.
बुधवारी रात्री पुणे शहरात पावसाने कहर केला. या पावसात पुण्यातल्या अनेक भागात पाणी साचून परिसर जलमय झाला होता. नागरिक जीव वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळी धाव घेत होते. अग्निशमन दलाचे जवान प्राणपणाने मदत कार्यात उतरले होते. यात अग्निशमन दलाचे जवान मारुती देवकुळे यांनी मित्रमंडळ चौक येथे पाण्यात अडकलेल्या बाळाला कर्तव्य तत्परतेने वाचविले. सध्या त्यांच्या या कामामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
हेही वाचा - पुण्यात पावसाचे थैमान; चारचाकी गेली वाहुन, कार चालकाचा मृत्यू