पुणे- मनसेच्या मुंबईतील मोर्चासाठी पुण्यातील अनेक मनसैनिक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. काही स्वतःच्या वाहनाने, काही दुचाकीने तर काही खासगी गाड्याने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
मनसेच्या मोर्चासाठी भाजप आमदाराची बस, मोर्चाला भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा - भोसरीचे आमदार महेश लांडगे
मुंबईत आज सुरू असलेल्या मनसेच्या मोर्चात पुण्यातून सहभागी होणाऱ्या मनसैनिकांच्या बसवर भाजप आमदाराचे नाव असल्याने मोर्चाला भजापचा पाठिंबा असल्याची चर्चा सुरु आहे.

भाजप आमदाराचे नाव असलेली बस
मनसेच्या मोर्चासाठी भाजप आमदराचे नाव असलेली बस
पण, मनसेच्या पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या कार्यालयाजवळून काही कार्यकर्ते बसने निघाले. परंतु या बसवर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे नाव असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे मनसेच्या या मोर्चाला भाजपचे तर पाठबळ नाही ना अशी चर्चा सुरू झाली. महेश लांडगे यांचे नाव असलेली ही बस मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. परंतु ही बस महेश लांडगे यांच्या नातेवाईकांची असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
हेही वाचा - मनसेच्या मोर्चासाठी पुण्यातून शेकडो मनसैनिकांची मुंबईकडे कूच