पुणे : शहरातील कोथरूड परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास कोथरूडमधील मुक्ताई को-ऑपरेटिव्ह सोसायटीत घडली. माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रामचंद्र लक्ष्मणराव बबलतकर (वय 55) असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
पुण्यात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या - पुण्यात बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या बातमी
कोथरूडमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रामचंद्र लक्ष्मणराव बबलतकर (वय ५५) असं आत्महत्या करणाऱ्याचे नाव असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
![पुण्यात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या पुण्यात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-06:14:35:1593693875-mh-pun-suceide-news-pune-02072020181228-0207f-1593693748-924.jpeg)
कोथरुड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र लक्ष्मणराव बबलतकर हे कोथरूडमधील मुक्ताई सोसायटीत कुटुंबीयांसह राहत होते. मागील दोन आठवड्यापासून ते आजारी होते. त्यांना मधुमेहाचा त्रास असून मागील काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणा जाणवत होता असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. सोलापूर येथे त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे.
आज सकाळपासून ते घरीच होते. दुपारच्या सुमारास अचानक राहत असलेल्या सोसायटीच्या टेरेसवर गेले आणि त्यांनी तिथून खाली उडी मारली. कुटुंबियांना ही माहिती समजतात त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात हलवण्यात आला आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी कोथरूड पोलीस अधिक तपास करत आहेत.