पुणे - इंग्लंडमधून पिंपरी-चिंचवड शहरात आलेला 35 वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. तो दहा दिवसापूर्वी शहरात आला होता. महानगर पालिकेचे पथक इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचा शोध घेत आहे. कोरोना रुग्ण सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
इंग्लंडमधून पिंपरी-चिंचवड शहरात आलेला 35 वर्षीय तरुण कोरोनाबाधित - कोरोना रुग्ण संख्या पिंपरी
इंग्लंडमधून पिंपरी-चिंचवड शहरात आलेला 35 वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. तो दहा दिवसापूर्वी शहरात आला होता. महानगर पालिकेचे पथक इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचा शोध घेत आहे. कोरोना रुग्ण सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
तरुणावर भोसरीमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांची संख्या 115 इतकी आहे. त्यापैकी 15 जण हे शहराबाहेर निघून गेल्याचे सांगण्यात आले. तर, 15 प्रवाशांचे पत्ते अपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापर्यंत अजून प्रशासन पोहोचलेले नाही. 85 जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक तरुण पॉझिटिव्ह आढळला असून, 70 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, उर्वरित 14 अहवाल येणे बाकी आहे. अशी माहिती आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी यांनी दिली.