बारामती (पुणे ) :भरधाव वाहनाने धडक दिल्याने शाळेत निघालेल्या १२ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना इंदापूर तालुक्यातील मौजे काठी गावामध्ये घ( Girl Died In Road Accident At Baramati ) डली. तृप्ती नाना कदम असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळत ( Dumper Set Fired By Angry Citizens In Baramati ) आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, रस्ते बांधकामावरील खडीने भरलेल्या हायवा वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने शाळेत निघालेल्या 12 वर्षीय शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यातील मौजे काठी गावामध्ये घडली. तृप्ती नाना कदम असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. वाहन चालक विनोद महादेव जवरे (वय ४० वर्ष रा.खैरा जि. यवतमाळ ) यास ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नानासाहेब कदम (रा.शेटफळ हवेली ता.इंदापूर) हे सकाळी दहा वाजताच्या दरम्यान बुलेट मोटारसायकल (क्र.एम.एच ४२ ए.व्ही ३७६४) वरून कृष्णा वय 11 व तृप्ती वय 12 वर्ष या मुलांना घेऊन शाळेत सोडण्यासाठी निघाले होते. त्यावेळी रस्ते बांधकामावरील खडीने भरलेला हायवा वाहन (क्र.एम.एच ४२ टी १६५३) ने पाठीमागून कदम यांच्या बुलेटला धडक मारली. तृप्ती ही मागील चाकाखाली सापडून जागीच मयत झाली. नानासाहेब कदम, कृष्णा कदम यांना किरकोळ जखम झाली आहे. दरम्यान संतप्त जमावाने हायवा वाहन पेटवून दिले होते. अग्नीशमन वाहनाच्या मदतीने आग विजवण्यात आली.
हेही वाचा :Nashik : नाशिकमध्ये डांबर वाहुन नेणारा डंपर उलटला; गरम डांबराखाली दबून ट्रक चालक गंभीर