पुणे - शिक्षण हा संविधानाने दिलेला मुलभूत हक्क. पण हा हक्क सगळ्यांना सहजतेने मिळतोच असे नाही. घरची परिस्थिती बेताची, त्यात लहान भावाची जबाबदारी सक्षमपणे पेलून सावित्रीची एक लेक अडथळ्यांवर मात करून शिक्षण घेतेय. रेश्मा जाधव या ९ वर्षीय मुलीने बालवयात हे आव्हान स्वीकारून 'इच्छा तिथे मार्ग' या म्हणीला तंतोतंत खरं ठरवले आहे.
घरची परिस्थिती अन् लहान भावाचा सांभाळ; पण शाळेची ओढ सुटेना, मग रेश्माने शोधला 'हा' पर्याय हेही वाचा -'टायमिंग हुकलं का क्वॉलिटी खराब,' वादग्रस्त वक्तव्यावरुन इंदोरीकर महाराज अडचणीत
पुणे जिल्ह्यातील मालेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रेश्मा चौथ्या वर्गात शिकते. रेश्माच्या घरची परिस्थिती हलाखीची. आई-वडील मोलमजुरी करून कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. कामाच्या निमित्ताने पालक घराबाहेर असल्याने लहान भावाची होणारी आबाळ रेश्माला बघवत नव्हती आणि शिक्षणाची ओढही सुटत नाही. मग काय या प्रश्नावर रेश्माने मोठ्या हुशारीने तोडगा काढला आणि शाळेतील शिक्षकांनीही त्याला पाठिंबा दर्शवला. लहान भावाचा सांभाळ करण्यासाठी शाळा चुकवली जाऊ नये म्हणून या भावालाच रेश्मा शाळेत घेऊन येते, त्याच्यासाठी झोका बांधून त्याला झोपवून वर्गात धडे गिरवते. खेळण्या बागडण्याच्या वयात पालक होऊन, ती तिच्या भावाचा सांभाळ करते.
हेही वाचा -'भाजपचे 'मिशन लोटस' जनतेने हाणून पाडले'
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपाने महाराष्ट्राला मिळालेला शिक्षणाचा वारसा रेश्मा समर्थपणे चालवत आहे. परिस्थितीने डगमगून न जाता दररोज येणाऱ्या अडचणींवर मात करून रेशमा शिक्षण तर घेतेच आहे, शिवाय घराची जबाबदारीदेखील सांभाळत आहे. रेश्माची शिक्षणासाठी असलेली तत्परता आणि जिद्दीला 'ईटीव्ही भारत'चा सलाम.