महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! पुण्यातील महिलांना पाठवले अश्लील मेसेज; 80 वर्षीय पुजाऱ्याला अटक - बाबा हरिदास महाराज पुणे

हा पुजारी उच्चशिक्षित असून इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो महिलांना अश्लील मेसेज पाठवून त्रास देत होता. माण तालुक्यातील शेणवाडी गावातील एका मंदिरातून या पुजाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुजाऱ्याने शिष्यांच्या मदतीने महिलांचे फोन नंबर मिळवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

pujari
आरोपी बाबा हरिदास महाराज उर्फ शरद बाळकृष्ण पत्की

By

Published : Dec 20, 2019, 12:45 PM IST

पुणे - महिलांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या 80 वर्षीय पुजाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. बाबा हरिदास महाराज उर्फ शरद बाळकृष्ण पत्की, असे आरोपी पुजाऱ्याचे नाव आहे.

सर्जेराव पवार, सहाय्यक आयुक्त

हा पुजारी उच्चशिक्षित असून इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो महिलांना अश्लील मेसेज पाठवून त्रास देत होता. माण तालुक्यातील शेणवाडी गावातील एका मंदिरातून या पुजाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुजाऱ्याने शिष्यांच्या मदतीने महिलांचे फोन नंबर मिळवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

हेही वाचा - भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी निघाली 'सौ. ४२०', पाच वर्षांत सात जणांना लाखोंचा गंडा

शेणवाडी गावच्या सरपंचांनादेखील या पुजाऱ्याचे वागणे खटकल्याने पुजाऱ्याने गाव सोडावे असा ठराव ग्रामसभेत पारीत करण्यात आला होता. त्यांनंतर स्वारगेट पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीने अजून काही महिलांना फसवल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे कोणाला याविषयी माहिती असल्यास कळवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details