महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

8 year Child Commits Suicide : मोबाईलमधील हॉरर व्हिडिओ ठरला जीवघेणा : आठ वर्षीय मुलाने बाहुलीला कैद्यासारखी फाशी देऊन घेतला गळफास - लेटेस्ट क्राईम न्यूज

आठ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या मुलाने बाहुलीला फाशी देऊन स्वतःही तोंडावर तसेच कापड टाकले अन् मग गळफास घेतला. मोबाईलमध्ये हॉरर व्हिडिओ पाहून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

8 year Child Commits Suicide
मुलाने बाहुलिला दिलेला गळफास

By

Published : Jun 1, 2022, 12:53 PM IST

Updated : Jun 1, 2022, 1:07 PM IST

पुणे -बाहुलीला फाशी दिल्यानंतर आठ वर्षीय मुलाने स्वतः ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मुलाने स्वतःही तोंडावर तसेच कापड टाकले अन मग गळफास घेतला. दोन दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना थेरगावमध्ये घडली. मोबाईलमधील हॉरर व्हिडिओ पाहून तसे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

मोबाईलमधील हॉरर व्हिडिओ ठरला जीवघेणा -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये राहत्या घरात आठ वर्षीय मुलाने खेळता-खेळता बाहुलीवर कपडा टाकून फाशी दिली. बाहुली मृत झाल्याचे समजून मुलाने देखील तोंडावर कपडा टाकून गळफास घेत आत्महत्या केली आहे. आई कामात व्यस्त असताना त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या धक्कादायक घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस देखील चक्रावले आहेत. मुलाने मोबाईलमधील हॉरर व्हिडिओ पाहून असे कृत्य केल्याचा अंदाज वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पालकांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवण गरजेचे असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Last Updated : Jun 1, 2022, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details