महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

10 जून पर्यत पुणे विभागातील 8 हजार 198 कोरोनाबाधित रुग्ण बरे, जिल्ह्यात बधितांचा आकडा 10 हजारांवर - Pune division corona cured patients record

विभागात एकूण 609 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 277 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

पुणे कोरोना आढावा, Pune corona update
Pune corona update

By

Published : Jun 10, 2020, 8:22 PM IST

पुणे- 8 हजार 198 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 हजार 28 झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण 4 हजार 221 आहे. विभागात एकूण 609 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 277 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.93 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यात 10 हजार 81 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 6 हजार 380 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 3 हजार 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 442 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 250 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 63.29 टक्के आहे. कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 366 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 230, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 107, सांगली जिल्ह्यात 4 तर कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 669 कोरोनाबाधित रुग्ण असून 401 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 240 आहे. कोरोनाबाधित एकूण 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 410 कोरोनाबाधित रुग्ण असून 792 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 493 आहे. कोरोनाबाधित एकूण 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यात 176 कोरोनाबाधित रुग्ण असून 97 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 73 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 692 कोरोनाबाधित रुग्ण असून 528 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 156 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकूण 1 लाख 5 हजार 552 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 1 हजार 575 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 977 नामुन्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 88 हजार 345 नामुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 13 हजार 28 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details