पुणे -निसर्ग चक्रीवादळात खेड जुन्नर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या वादळात खेड तालुक्यातील वाहागाव येथे मायलेकांचा मृत्यु झाला होता. मृत्यु झालेल्या नवले कुटुंबियांना आपातकालीन निधीतुन आठ लाखांची मदत करण्यात आली आहे. याबाबतचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कुटुंबीयांकडे सुपुर्त करण्यात आला आहे. आज (शुक्रवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड जुन्नर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
#Cyclone 'निसर्ग' : खेड तालुक्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 8 लाखांची मदत - Mother son died nisarga cyclone pune
दोन दिवसांपुर्वी निसर्ग चक्रीवादळाने खेड आणि जुन्नर तालुक्यात घरे, शाळा, स्माशनभुमी, समाजमंदिरे, अंगणवाडी, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड तालुक्यातील करंजविहरे, वाहागाव, धामणे, शिवे तर जुन्नर तालुक्यातील सावरगाव, पारुंडे, येणेरे या गावांमध्ये नुकसानीची पाहणी केली.
मृतांच्या कुटुंबियांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार.
निसर्ग चक्रीवादळात शेती व घरांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. पंचनामे पुर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, प्रांतधिकारी संजय तेली, तहसिलदार सुचित्रा आमले, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहितेपाटील, आमदार सुनील शेळके आदी. उपस्थित होते.
Last Updated : Jun 5, 2020, 7:05 PM IST