पुणे:याबाबत पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादित नमूद करण्यात आले की, 6 मे रोजी रात्री 8 ते 10 वाजल्याच्या दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घराचे पाठीमागच्या दरवाजाचे कुलूप तोडले गेले. यानंतर त्यांचा सिक्युरीटी गार्ड झंकार बहादुर सौद (रा. नेपाळ) आणि त्याचे इतर दोन साथीदारांनी घराचे आतमध्ये प्रवेश केला. आरोपींनी तब्बल 79 लाखाचे पैसे आणि दागिने चोरून नेले.
या दागिन्यांचा समावेश: चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये अंगठ्या, चार चैन, हातातील कडा, दोन ब्रेसलेट, चार सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे बिस्कीट, गळ्यातील कुंदनहार सेट, गोल्ड गळपातील हार सेट, कानातील रिंगा, डॉयमंड पेंड, कानातील झुमके, चांदीचे पैजण यासह इतर दागिन्यांचा समावेश आहे. चोरांनी एकूण ५८, १३०००/- रुपयांची रोख रक्कम देखील लंपास केली.
लग्नकार्यात गेलेल्या कुटुंबाकडे चोरी: घराच्या शेजारी असलेल्या लग्नकार्यात सहभागी होणे एका कुटुंबाला बावीस लाखात पडले आहे. नरेंद्र बळीराम कोहाड यांच्यासह संपूर्ण कुटुंब लग्नात सहभागी होण्यासाठी गेले. यावेळी अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी घरात डल्ला मारून लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. चोरी गेलेल्या मुद्देमालाची किंमत एकूण २२ लाख रूपये आहे.