पुणे- पत्नीची चाकूने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्याच्या वानवडी परिसरातील फ्लॉवर व्हॅली सोसायटीत आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. 66 वर्षीय पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या करणार असल्याची चिट्ठी लिहून 78 वर्षीय पती बेपत्ता झाला आहे.
धक्कादायक! पत्नीची गळा चिरून हत्या; आत्महत्येची चिठ्ठी लिहून 78 वर्षीय पती बेपत्ता - थरुणाला खिळलेल्या पत्नीची
पुण्याच्या वानवडी परिसरातील फ्लॉवर व्हॅली सोसायटीत आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या करणार असल्याची चिट्ठी लिहून 78 वर्षीय पती बेपत्ता झाला आहे.
देविंदर कौर बिंद्रा (66) असे मृत महिलेचे नाव आहे. तर, पती हरविंदर सिंग बिंद्रा (वय 78) फरार आहे. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. सकाळी झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार त्यांचा मुलगा रमेन्द्रा सिंह बिंद्रा यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. अंथरुणाला खिळलेल्या पत्नीची 30 वर्षे सेवा केल्यानंतर अखेर यापुढे मला आता तिची सेवा करता येणार नाही. त्यामुळे पत्नीचा खून करून मी स्वतः आत्महत्या करणार आहे, यासाठी अन्य कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी लिहून आरोपी पती बेपत्ता झाला आहे.
वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला असून, बेपत्ता हरविंदर सिंग बिंद्रा याचा शोध सुरू आहे.