महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोविड-19 : एका दिवसात 78 नवे रुग्ण, 70 हजार नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराचा निर्णय - गर्दीमुळे कोरोना प्रसाराची भीती

पुण्यात कोरोनामुळे पसरलेल्या महामारीने अधिकच गंभीर स्वरूप धारण केले आहे. यामुळे महापालिकेने शहरातील अतिसंक्रमित क्षेत्रातील लोकांना तात्पुरते स्थलांतरित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दाट लोकवस्तीमुळे लॉकडाऊनचा फायदा होत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे महापालिकेने म्हटले आहे. 70 हजार नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर होणार आहे. पहिल्या टप्प्यात 20 हजारांचे स्थलांतर केले जाईल.

कोविड-19 : एका दिवसात 78 नवे रुग्ण, 70 हजार नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराचा निर्णय
कोविड-19 : एका दिवसात 78 नवे रुग्ण, 70 हजार नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराचा निर्णय

By

Published : Apr 28, 2020, 9:47 AM IST

पुणे - कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर शहरात अत्यावश्यक सेवेसाठी आता सकाळी 10 ते दुपारी 2 वेळ ठेवली आहे. उद्यापासून याची अंमलबजावणी होईल, असे महापौरांनी सांगितले. तसेच, शहरातील अतिसंक्रमित क्षेत्रातील लोकांना तात्पुरते स्थलांतरीत करण्याचे योजना मनपाने तयार केली आहे. यात पहिल्या टप्प्यात 20 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. दाट लोकवस्तीमुळे लॉकडाऊनचा फायदा होत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे मनपा

पुणे शहरात सोमवारी (27 एप्रिल) एका दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत 78 ने वाढ झाली. तर, दिवसभरात 3 कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात मृत्यूंची संख्या 80 वर पोहोचली आहे. यामध्ये शहरातील 75, पिंपरी चिंचवडमधील तीन, कॅटोमेन्ट आणि नगरपालिका हद्दीतील दोघांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 210 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. यामध्ये शहरातील 176 आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 29 जणांचा समावेश आहे.

कोरोनामुळे पसरलेल्या महामारीने अधिकच गंभीर स्वरूप धारण केले आहे. यामुळे महापालिकेने शहरातील अतिसंक्रमित क्षेत्रातील लोकांना तात्पुरते स्थलांतरित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यात पहिल्या टप्प्यात 20 हजार लोकांना स्थलांतरित केले जाईल. त्याची जबाबदारी पोलीस आणि वॉर्ड ऑफिसर यांच्यावर आहे. दाट लोकवस्तीमुळे लॉकडाऊनचा फायदा होताना दिसत नाही. यामुळे महापालिकेला स्थलांतराचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सांगण्यात आले. पुण्याच्या अतिसंक्रमित दाट लोकवस्ती भागातील कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने तब्बल 70 हजार नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 445 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेले 11 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, शहरात गंभीर स्थितीतील 49 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 30 ससूनमध्ये तर, उर्वरित रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची एकूण संख्या 1 हजार 217 वर पोहोचली आहे. यापैकी 966 रुग्ण 'अ‌ॅक्टिव्ह' आहेत.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 348 झाली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील 93, पुणे ग्रामीणमधील 35, हवेलीतील 20, जुन्नरमधील एक, शिरूरमधील दोन, मुळशीतील एक, भोरमधील दोन, वेल्ह्यातील आठ आणि बारामतीतील एका रुग्णाचा समावेश आहे. याशिवाय, कॅटोन्मेन्ट हद्दीतील रुग्णांची संख्या 23 , बारामती नगरपालिकेतील 7 अशी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details