पुणे- आचारसंहिता जाहीर होताच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक मतदान प्रक्रिया आणि सुरक्षेचा आढावा जाहीर केला. विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील 76 लाख 86 हजार 636 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. युवा मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. लोकसभेनंतर तरुणांच्या मतदानात 60 हजारांवर वाढ झाली. त्यामुळे येत्या निवडणुकीत तब्बल 1 लाख 34 हजार 666 तरुण पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे. तब्बल 70 हजार कर्मचारी ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कार्यरत आहेत.
हेही वाचा -कोण राखणार किल्ले 'शिवनेरी'च्या जुन्नर विधानसभेचा गड; चौरंगी लढतीची शक्यता
जिल्ह्यात एकूण 7 हजार 920 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. यंदा सर्व मतदान तळमजल्यावर घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर दुर्गम भागात ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तिथं वायरलेस आणि सॅटेलाईट फोनचाही वापर करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनानेही निवडणुकीची तयारी पूर्ण केली.